सुख सदने शशी वर्दने अंबे मृगनयनी ||
गजगमने सूर नमने कोल्हासूर मथने ||
सुरवर वर्षीती सुमने करोनि या नमने ||
भय हरणे सुख करणे सुंदर शिव रामने ||
जय देवी जय देवी ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी || धृ ||
मृगमद मिश्रित केशर शोभते ते भाळी ||
पुंचीत केश विराजित मुक्तातून भाळी ||
रत्न जडित सुंदर अंगी कातोळी ||
चिदधनाचा गाभा अंबा वेंधाळी ||
जय देवी जय देवी || १ ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी ||
कंठी विलसत सगुणा मुक्तसुविशेषे ||
पितांबर सुंदर कासीयला कासे ||
किती किती कांची धनी मंजुळ भासी ||
पदकमळा लावण्या अंबा शोभतसे ||
जय देवी जय देवी || २ ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी ||
झळ झळ झळ झळकती तानवने करणी ||
तेजा लोपून गेले रवी शीश निज करणी ||
ब्रम्हा हरिहर सकलीत नेणती ताव करणी ||
अद्भुत लीला लिहिता न पुरे हि धरणी ||
जय देवी जय देवी || ३ ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी ||
अष्टही भुजा सुंदर भासीतसी शोभा ||
झग झग झग झागित लावण्य प्रभा ||
मघ मघ मघ मघ माघीत सुमनांची शोभा ||
त्र्यंबक मधुर होऊनि वर्णितसे शोभा ||
जय देवी जय देवी || ४ ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी ||