जय देवी श्री देवी संतोषी माते
वंदन भावे माझे तव पद कमलाते
जय देवी जय देवी || धृ ||
श्रीलक्ष्मीदेवी तू श्रीविष्णूपत्नी
पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी
जननी विश्वाची तू जीवन चिच्यछक्ती
शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती
जय देवी जय देवी ||1 ||
गुरूवारी श्रध्देने उपास तव करिती
आंबट कोणी काही अन्न न सेवीती
गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती
मंगल व्हावे म्हणूनी कथा श्रवण करिती
जय देवी जय देवी ||2 ||
जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती
अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थती
त्यांच्या हाकेला तू धावूनिया येसी
संतती वैभव कीर्ती धनदौलत देसी
जय देवी जय देवी || 3 ||
विश्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे
भवभय हरूनी आम्हा सदैव रक्षावे
मनीची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी
म्हणूनी मिलिंद माधव आरती ओवाळी
जय देवी जय देवी ||4 ||