सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा हाती शोभे हिरवा चुडा ।
दिला प्रसादाचा पेढा || १।।
सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
नेत्रांच्या लावल्या वाती ।
पंच प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या ज्योती ।। २ ||
सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
भावभक्तीच्या केल्या माळा |
घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे पुंगरमाळा | केला … सोहळा || ३ ||
सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
रेणुकेची भरली ओटी ।
लावली चंदन ऊटी किर्ती तिची जगजेठी । झाली दर्शना दाटी ।। ४ ||
सोन्याच्या पावलाने |
महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।