केळीच्या पानावर उगवला दिवस
आज आमच्या गुलाबाईला कितवा दिवस
आज आमच्या गुलाबाईला सातवा दिवस
सातव्या दिवशी बाळाला टोपलं मोत्यानं गुंफलं
जो जो रे बाळा जो जो जो रे
भाद्रपदाच्या महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला
पार्वती बोले शंकराला चला हो माझ्या माहेराला
जाता बरोबर पाट बसायला विनंती करूया सरस्वतीला
सरस्वती सरस्वती जगदंबे जगदंबे
फुल चढाओ बेअंबे
बेअंबे का आकडा,सो सो घोडा वाकडा
एक घोडे का लंबा पैर, उपर बैठे गुलोजी
गुलोजी को प्रणाम करो, शुभ पौर्णिमा शुभ दिनी या
भाद्रपदाचा तुम्ही पहा, आज पूजन करू आम्ही
गाणे प्रेमाने गाऊ गाणे गाऊ
गाणे गाऊ प्रसाद घेऊ
आनंदाची वाट बरी, गंधाचा गंध नाव गंध
शोभा अनंत देशाची, आरती गुलोजी राण्याची