Datta Bavani Lyrics in Marathi | श्री दत्त बावनी

Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

॥ श्री दत्त बावनी ॥

जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥१॥

अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥२॥

ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥३॥

अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥४॥

काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥५॥

कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥६॥

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥७॥

ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥८॥

दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥९॥

केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ॥१०॥

विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥११॥

जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥१२॥

पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥१३॥

ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥१४॥

घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥१५॥

बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥१६॥

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥१७॥

धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥१८॥

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥१९॥

स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥२०॥

पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥२१॥

सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥२२॥

वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥२३॥

वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥२४॥

निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥२५॥

दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥२६॥

घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥२७॥

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥२८॥

पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥२९॥

अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥३०॥

तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥३१॥

एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥३२॥

तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥३४॥

राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥३५॥

शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥३६॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥३७॥

आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥३८॥

मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥३९॥

डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥४०॥

पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥४१॥

करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥४२॥

साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥४३॥

राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥४४॥

नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥४५॥

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥४६॥

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥४७॥

सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥४८॥

वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥४९॥

थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥५०॥

अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥५१॥

तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥५२॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

Share it:

Related Posts

Leave a Comment