Hanuman Aarti in Marathi | श्री हनुमान आरती

Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

॥ श्री हनुमान आरती ॥

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं ।
सुरवर, नर, निशाचर त्या झाल्या पळणी ।।१।।

जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।

दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द ।
धगधगिला धरणीधर मानिला खेद ।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ।।२।।

मारुतीची आरती २

जय देवा हनुमंता । जय अंजनीसुता ॥
ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ध्रु०॥

वानरूपधारी । ज्याची अंजनी माता ।
हिंडता वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो रामभक्त । ज्याने मांडिली कथा ॥ जय० ॥१॥

सीतेच्या शोधासाठीं । रामे दिधली आज्ञा ॥
उल्लंधुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना । मुद्रा टाकिली खुणा ॥ जय० ॥२॥

सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिले । मारिला अखया दारुण ।
परतोनी लंकेवरी । तवं केले दहन ॥ जय० ॥३॥

निजबळे इंद्रजित । होम करी आपण ॥
तोही त्वां विध्वसिला । लघुशंका करून ॥
देखोनी पळताती । महाभूते दारुण ॥ जय० ॥४॥

राम हो लक्षुमण । जरी पाताळी नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी । जळी प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण । क्षणामाजि मर्दिले ॥ जय० ॥५॥

देउनी भुभुःकार । नरलोक आटीले ॥
दीनानाथ माहेरा । त्वां स्वामिसी सोडविले ॥
घेऊनी स्वामी खांदी । अयोध्येसी आणिले ॥ जय० ॥६॥

हनुमंत नाम तुझे । किती वर्णू दातारा ॥
अससी सर्वांठायी । हारोहारी अम्बरा ॥
एका जनार्दनी । मुक्त झाले संसारा ॥ जय० ॥७॥

Share it:

Related Posts

Leave a Comment