॥ श्रीकृष्णाची आरती ॥
ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ॥ध्रु॥
चरणकमल ज्याचे ति सुकुमार।
ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर॥ ओवाळू ॥१॥
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान॥ ओवाळू ॥२॥
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी।
वेधले मानस हारपली दृष्टी॥ ओवाळू ॥३॥
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान।
तेणे कोंदले अवघे त्रिभुवन॥ ओवाळू ॥४॥
एका जनार्दनी देखियले रूप।
पाहता जाहले अवघे तद्रूप॥ ओवाळू ॥५॥