Swami Samarth Aarti in Marathi | स्वामी समर्थांची आरती

Print Friendly, PDF & Email
Rate this post

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा || धृ ||
जयदेव जयदेव…

छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,
जगउद्धारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी || १ ||
जयदेव जयदेव….

त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,
याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार || २ ||
जयदेव जयदेव….

देवाधिदेव तू स्वामीराया,
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,
शरणागता तारी तू स्वामीराया || ३ ||
जयदेव जयदेव..

अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता न लगे चरणावेगळे || ४ ||
जयदेव जयदेव..

Share it:

Related Posts

Leave a Comment